दहावीनंतरच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींचे निर्मूलन उद्या करणार.

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

दहावी निकालानंतर ऑनलाइन प्रवेश सुरु झाले आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद इथे सुरळीत प्रवेश सुरु असून, मुंबईत पार्ट 1 मध्ये 30 हजार जणांचे प्रवेश राहिले आहेत. मुंबईत 67 हजार 300 विद्यार्थीनी पार्ट 2 चा फॉर्म नीट भरला आहे. त्यानंतर सर्वर स्लो होण, हँग होण अशा तक्रारी आल्या. मी सर्वांशी बैठक घेतली आहे. सर्वर वाढवण्याचे काम सुरू आहे. पण गोंधळ होऊ नये म्हणून उद्याचा पूर्ण दिवस हे काम सूरू राहील. त्यानंतर परवापासून दहावीनंतरची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहीती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. 

मुंबई : दहावी निकालानंतर ऑनलाइन प्रवेश सुरु झाले आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद इथे सुरळीत प्रवेश सुरु असून, मुंबईत पार्ट 1 मध्ये 30 हजार जणांचे प्रवेश राहिले आहेत. मुंबईत 67 हजार 300 विद्यार्थीनी पार्ट 2 चा फॉर्म नीट भरला आहे. त्यानंतर सर्वर स्लो होण, हँग होण अशा तक्रारी आल्या. मी सर्वांशी बैठक घेतली आहे. सर्वर वाढवण्याचे काम सुरू आहे. पण गोंधळ होऊ नये म्हणून उद्याचा पूर्ण दिवस हे काम सूरू राहील. त्यानंतर परवापासून दहावीनंतरची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहीती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. 

यावेळी बोलताना तावडे म्हणाले, अडीच लाख विद्यार्थी एकाच वेळी येणार हे गृहीत धरून उद्या सर्व सुधारणा केल्या जातील. मी स्वतः संध्याकाळी एक्सपर्टना घेऊन तपासणी करेन आणि परवा सकाळी 10 पासून परत प्रवेश सुरु करू होतील. वेळ लागला तरी प्रवेश बिनचूक व्हायला हवेत.

मुंबई वगळता सगळीकडे ही प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. मुंबईत ज्यांनी प्रकिया पूर्ण केली आहे, त्यांनी परत या प्रक्रियेत भाग घ्यायची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.