झाई दूरध्वनी केंद्रांचा कारभार गलथान 

अच्युत पाटील
मंगळवार, 10 एप्रिल 2018

बोर्डी - भारत संचार निगमच्या गलथान कारभारामुळे झाई दूरध्वनी केंद्र कोमामध्ये गेले आहे. एकूण दोनशे पन्नास दूरध्वनी ग्राहकांनी कायमचा राराम ठोकला आहे तर उर्वरित पंधरा दुरध्वनी मृत अवस्थेत आहेत.

बोर्डी - भारत संचार निगमच्या गलथान कारभारामुळे झाई दूरध्वनी केंद्र कोमामध्ये गेले आहे. एकूण दोनशे पन्नास दूरध्वनी ग्राहकांनी कायमचा राराम ठोकला आहे तर उर्वरित पंधरा दुरध्वनी मृत अवस्थेत आहेत.

1993 साली सुरू झालेल्या झाई दुरध्वनी केंद्रातंर्गत सुमारे दोनशे पंच्चाहत्तर दुरध्वनी जोडण्या देण्यात आल्या होत्या. परंतु केंद्रात नादुरूस्तीचे प्रकार नित्याचेच झाल्याने ग्रहाकांना विनाकारण त्रास सुरू झाला. भरमसाठ रकमेची बीलं आणि सेवा रामभरोसे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक ग्राहकांनी हळूहळू भारत संचार निगमला रामराम ठोकण्यास सुरुवात केली. पंचवीस वर्षानंतर झाई दूरध्वनी केंद्रातंर्गत फक्त पंधरा दूरध्वनी जोडण्याची नोंद कर्यालयात आहे. तर केंद्रासाठी स्वतंत्र लाईनमन नाही. मागील पाच वर्षापासून दुरध्वनी केंद्रातील लहानसहान दुरुस्तीची कामं सुरक्षारक्षकाला सोपविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आल्या नंतर आता सुरक्षारक्षकाला कामावरुन कमी केल्याने दूरध्वनी केंद्राची सुरक्षा रामभरोसे असल्याची चर्चा आहे.

Web Title: Operations of the Zai Telephone Center

टॅग्स