कल्याणमध्ये खान्देश फेस्टिवलचे आयोजन

bharit-bhakri
bharit-bhakri

कल्याण - खान्देशातील खाद्य संस्कृती, कृषी, कला, उद्योग व पर्यटनाला वाव मिळावा यासाठी कल्याणमध्ये खान्देश फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.  या वर्षी 13 ते 15 एप्रिल रोजी याचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, कल्याणमधील खडकपाडा येथील साईचौकात खान्देश फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. या खान्देश फेस्टिवलचे उदघाटन राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन करणार असून, स्वागताध्यक्ष कल्याणचे आमदार नरेंद्र पवार आहेत. 

यावेळी राज्याचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील, मुख्य अतिथी राज्यमंत्री सदा भाऊ खोत व प्रमुख अतिथी म्हणून आमदार जगन्नाथ शिंदे, गणपतशेठ गायकवाड, उन्मेष पाटील उपस्थित राहणार आहे. 

खान्देशातील कळण्याची भाकरी, ठेचा, वांग्याचे भरीत, खापरावरचे मांडे, फुणके, कुरडई, पापड या खादयांच्या स्टॉलसोबतच खान्देशातील शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी गहू, दादर, बाजरी व कडधान्यसुद्धा खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये खान्देशातील सण, साहित्य, कला व संस्कृतीवर कार्यक्रम होणार असून यामधून खान्देशची ओळख होणार आहे.

यावेळी खादेशातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित उज्वल निकम, मॅगसेसे विजेत्या निलिमा मिश्रा व समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांना खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

14 एप्रिल रोजी मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे, अध्यक्ष म्हणून खासदार कपिल पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार हरिभाऊ जावळे, संजय केळकर, कुणाल पाटील, निरंजन डावखरे तर समारोपाला रविवार 15 एप्रिल रोजी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथराव खडसे राज्य मंत्री रविंद्र चव्हाण, दादासाहेब भुसे,खा.ए टी.नाना पाटील, खा. हेमंत गोडसे, आ. किसन कथोरे, आ.शिरीष चौधरी आदी उपस्थित राहणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले

खान्देशातील या फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी मुंबई, नवी मुंबई ,ठाणे, पालघर व रायगड मधील हजारो खान्देशवासीयांनी सहकुटुंब भेट देण्याचे आवाहन उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख अनिल बोरनारे यांनी केले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com