पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी

rajendra gavit
rajendra gavit

मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीपासून 14 फेऱ्य़ांमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा ही सुरुवातीला तिसऱ्या स्थानावर होते, नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. अखेर गावित विजयी झाले.

पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले होते. शिवसेना आणि भाजपने याठिकाणी प्रतिष्ठेची लढाई बनविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साम, दाम, दंड, भेद या ऑडिओ क्लिपमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रचाराची राळ उडविली होती.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार होते. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com