राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचा शासनाला विसर

प्रमोद पाटील
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

गेल्या वर्षी 5 सप्टेंबर रोजी राज्यातील गणेशोत्सव सण लक्षात घेऊन 3 सप्टेंबर रोजी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची शासनाने यादी जाहीर करून 8 ऑक्टोबर रोजी एका भव्य कार्यक्रमात त्याचे वितरण करण्यात आले.

सफाळे : समाजाची निःस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगिकृत कामात प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शासनाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी सन्मानाने  दिला जातो.  मात्रवर्षी आजतागायत या पुरस्कारांची साधी घोषणा सुद्धा न झाल्याने शिक्षक वर्गात प्रचंड प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. 

दरवर्षी डाॅ. सर्वपलली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय आणि राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात येतो. या वर्षाचा राष्ट्रीय पुरस्कार 5 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. गेल्या वर्षी 5 सप्टेंबर रोजी राज्यातील गणेशोत्सव सण लक्षात घेऊन 3 सप्टेंबर रोजी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची शासनाने यादी जाहीर करून 8 ऑक्टोबर रोजी एका भव्य कार्यक्रमात त्याचे वितरण करण्यात आले.

या वेळी मात्र 5 सप्टेंबर येऊन गेला तरीही शासनाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकांची साधी यादी सुद्धा जाहीर केलेली नाही. त्या मुळे या पुरस्कारांचे मानांकन असलेल्या शिक्षकांमधे असलेली उत्सुकता कमी झाली असून शासनाच्या चालढकल  धोरणाचा सर्व स्तरावर असंतोष वयकत होत आहे. शासनाला शिक्षकांचा विसर पडला की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’