तलासरीत घरात 40 कोटींचे अमली पदार्थ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

पालघर/ तलासरी - पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्‍यातील दपचारी परिसरातील एका घरात तब्बल 40 कोटींचे अमली पदार्थ सापडले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) छापा घालून ही कारवाई केली. यातील तिघे आरोपी मात्र पळून गेले.

नालासोपारा येथे गेल्या आठवड्यात पोलिसांनी अमली पदार्थप्रकरणी तिघांना पकडले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पालघर गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी (ता. 3) सायंकाळी चार वाजता दपचारी दुग्ध प्रकल्पाच्या परिसरातील एका घरावर छापा घातला. बुधवारी (ता. 4) पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. यात सुमारे 26 कोटींचे 5.2 किलो हेरॉईन, 24.69 किलो एमडीएम आणि चार कोटींचे अन्य अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. या वेळी कर्नाटक पासिंगची एक मोटारही पोलिसांना सापडली.