पालघर : अखेर पाच दिवसांनंतर बेपत्ता तरूणाचा मृतदेह सापडला

प्रमोद पाटील
सोमवार, 24 जुलै 2017

सुभाष हा वसई- विरार नविन पाईप लाईन सुरु असलेल्या कंत्राटदार घारपुरे यांच्याकडे वाहन चालकाचे काम करित होता. सदर तरुणास वाहून गेल्याचे कुणीही पाहीले नसल्याने मनोर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. गेल्या पाच दिवस गावातील तसेच परिसरातील लोक त्याच्या शोधात होते. अखेर पाच दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला. पाटील यांच्या पश्चात्य दोन मुली व एक मुलगा आणि पत्नी असा  परिवार आहे. 

पालघर: तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने तसेच धराणांतील पाणी सोडल्याने नदी- नाल्यांना पुराचे स्वरूप आले होते. यावेळी मनोर- पालघर या मुख्य रस्त्यावरील मासवण येथील सूर्या नदीच्या जुन्या पुलावर बुधवारी  (19) रात्री नऊ च्या दरम्यान मोटार सायकल आढळून आल्याने सुभाष घरत हा तरुण या पुरात वाहून गेल्याची भिती वर्तवली जात होती .अखेर सोमवारी सुभाष पाटील (वय 38) रा. वसरे  यांचा मृतदेह पारगाव-गिराळे या भागात सापडला. 

तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने येथील वैतरणा आणि सुर्या या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पुरात वाहुन गेल्याच्या संशयावरुन वसरे गावातील ग्रामस्थ त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करित होते. घरत हे बुधवारी (19) सकाळी कामावर गेले होते ते रात्री घरी परतलेच नाहीत. मासवणच्या पुलावर त्याची मोटारसायकल आढळुन आल्याने गावकऱ्यांनी शोध मोहीम सुरु केली. खामलोली, बहाडोली, पारगाव या खालील प्रवाहातील नदी शेजारील गावकऱ्यांना शोध मोहीमेस मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र,पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने शोध घेवूनही त्याचा शोध लागत नव्हता. 

सुभाष हा वसई- विरार नविन पाईप लाईन सुरु असलेल्या कंत्राटदार घारपुरे यांच्याकडे वाहन चालकाचे काम करित होता. सदर तरुणास वाहून गेल्याचे कुणीही पाहीले नसल्याने मनोर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. गेल्या पाच दिवस गावातील तसेच परिसरातील लोक त्याच्या शोधात होते. अखेर पाच दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला. पाटील यांच्या पश्चात्य दोन मुली व एक मुलगा आणि पत्नी असा  परिवार आहे. 

मासवण  येथील जुने पूल वाहतूकीला बंद  करण्याची मागणी 
पालघर-मनोर रस्त्यावर सूर्या नदीच्या येथे  असलेला जुना पुल सातत्याने पाणयाखाली जातं  असलयाने नविन  पुलं बांधण्यात आला. हा पूल गेल्या दोन  वर्षांपासून  वाहतूकीला खुला करण्यात आला आहे. मात्र अजूनही  काही वाहने ही जुन्या पुलावरून जातात.  सदर  पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सदर पुलावरून ये  जा करणे बंदी घालण्यात यावी  तसेच तेथे लोखंडी बॅरेट टाकावेत अशी परिसरातील लोकांची मागणी आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :