सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रसिक हजारे यांचे आकस्मिक निधन

संजीत वायंगणकर
बुधवार, 21 जून 2017

मान्यवर गायकांना साथ करणारे सतारवादक आणि अखंड उत्साहाचा झरा म्हणून ओळख असलेल्या पंडित रसिक हजारे (वय 58) यांचे आज (बुधवार) पहाटे आकस्मिक निधन झाले.

डोंबिवली - मान्यवर गायकांना साथ करणारे सतारवादक आणि अखंड उत्साहाचा झरा म्हणून ओळख असलेल्या पंडित रसिक हजारे (वय 58) यांचे आज (बुधवार) पहाटे आकस्मिक निधन झाले.

भारतरत्न पंडित रविशंकर आणि शमीम अहमद खान यांचे शिष्य रसिक हजारे हे मद्रास विश्व विद्यालयाचे एम फिल होते. मुंबई विश्व विद्यालय, नाथीबाई विश्व विद्यालयात तसेच डोंबिवली येथील 'रसिक संगीत विद्यालय येथे त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना सतारवादनाचं मार्गदर्शन केले. स्वरतीर्थं सुधीर फड़के स्मृति समिति डोंबिवलीचे ते गेली 3 वर्षे विश्वस्त होते. सदैव हसतमुख, मदतीला कायम तत्पर आणि सात्विक विचार सरणी, साधी राहणी अशी त्यांची वैशिष्ट्य आहेत. अनेक वर्षांपूर्वी त्यांच्याच संकल्पनेतून साकार झालेला 'राग रंग गीत बंध' हा कार्यक्रम खूप गाजला. त्यांच्या पश्‍चात डोंबिवलीतील एकमेव दिलरुबा वादक म्हणून वय वर्षे 95 असलेले त्यांचे वडील शरद हजारे, आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.