खांद्याला खांदा लावून काम करेन

खांद्याला खांदा लावून काम करेन

पनवेल - प्रभाग क्रमांक एक, दोन आणि तीन या ग्रामीण भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. पालिकेच्या माध्यमातून गैरसोई प्राधान्याने दूर करू. विरोधकांनी कितीही थापा मारल्या तरी त्यांना निधी आणता येणार नाही. कारण, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. स्मार्ट पनवेलसाठी भाजपला एकहाती सत्ता द्या. तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेन, असे आश्‍वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य नवनाथशेठ पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर ते बोलत होते. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय हा भूमिपुत्रांचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळात शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य नवनाथशेठ पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष राजेंद्र येरुणकर, ज्येष्ठ नेते गोपीनाथ पाटील, धर्मनाथ भोईर, पांडुरंग निघुकर, हरिदास पाटील, सुरेश ठाकूर, नंदकुमार म्हात्रे, पांडुरंग पाटील आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना चव्हाण म्हणाले की, भाजपच्या राष्ट्रीय प्रवाहात येण्याचा आपला निर्णय विकासाकडे जाणारा आहे. केंद्र आणि राज्य सरकारला भूमिपुत्रांबद्दल आदर आहे. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून सरकारने भूमिपुत्रांचा सन्मान केला आहे. एकविचारी सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेपासून केंद्रातील सरकारपर्यंत असेल तर विकास जलद गतीने होतो. पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक एक, दोन आणि तीन या ग्रामीण भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. पालिकेच्या माध्यमातून हा अभाव प्राधान्याने दूर करणार, असे आश्‍वासन चव्हाण यांनी दिले.

रवींद्र चव्हाण यांचे आश्‍वासन यांनी केला पक्षप्रवेश
शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य नवनाथशेठ पाटील यांच्यासह शुभम बिल्डर्सचे दिलीप बाळाराम पाटील, गुरुनाथ बाळाराम पाटील, पनवेल तालुका कामगार सेल उपाध्यक्ष नितेश पाटील, साईनाथ प्रधान, वासुदेव प्रधान, रमेश प्रधान, संजय कोळी, प्रकाश पाटील, नीलेश प्रधान, नाना प्रधान, विश्‍वनाथ पाटील, तकदीर पाटील, महेश निघुकर, नवनीत निघुकर, संजय निघुकर, हरिश्‍चंद्र निघुकर, हरिश्‍चंद्र कोळी, संतोष प्रधान, अर्जुन पाटील, बंटी पाटील, शरद पाटील, रवी पाटील, मनोज पाटील, शरद प्रधान, निवृत्ती निघुकर, संजोग पाटील, अनिल पाटील, जगदीश कोळी, भास्कर पाटील, संतोष पाटील, विकी पाटील, गणेश पाटील, सुनील पाटील, महेश पाटील, रूपेश प्रधान, श्रीकृष्ण निघुकर, नितेश निघुकर, रूपाल मोरे, बाळाराम पाटील, प्रभाकर पाटील, कैलास पाटील, विलास कोळी, रमेश पाटील आणि रमन कदम यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

आत्मविश्‍वास दुणावला
प्रत्येकाशी मित्रत्वाचे नाते जोडणाऱ्या नवनाथशेठ यांच्या कामाची दखल शेकापने घेतली नाही. भाजपसोबत येण्याचा त्यांचा निर्णय निश्‍चितपणे पक्षाला ताकद देणारा आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक एकच्या चारही उमेदवारांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. प्रभाग एक परिसरातील इतर ग्रामीण भागाच्या प्रभागातील समस्या सारख्या असून, येथील रस्ते, पाणी, प्रदूषण, शाळा आणि आरोग्य व्यवस्था याबाबत खूप काम करायचे आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

राज्यात नगण्य असलेल्या शेकापने विकासाची फक्त बॅनरबाजी केली आहे. शेकापने त्यांच्या हातातील सत्तेचा वापर भ्रष्टाचारासाठी केला आहे. त्यामुळे नवनाथशेठ पाटील यांनी विकासाचा मार्ग निवडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भाजपकडून पाटील यांचा योग्य तो सन्मान केला जाईल.
- प्रशांत ठाकूर, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com