मतदान न केल्यास ‘कटप्पा’ मारेल!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पनवेल - पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी बाहुबली चित्रपटातील दोन पात्रांचा वापर केला जात आहे. यात ‘कटप्पाने बाहुबली को क्‍यों मारा’ असा प्रश्‍न विचारला जात असून, बाहुबलीने मतदान करण्यास नकार दिल्याने त्याला मारले, असे गमतीशीर उत्तर जाहिरातीद्वारे दिले जात आहे. त्यामुळे हे चित्ररथ पनवेलकरांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. 

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (ता. २४) मतदान आणि शुक्रवारी (ता. २६) मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने निवडणूक आयोगाकडून विविध हातखंडे उपयोगात आणले जात आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेने ‘कटप्पा’चा चित्ररथ तयार केला आहे. ‘कटप्पाने बाहुबली को क्‍यों मारा’ असा प्रश्‍न विचारला जात आहे. तसेच बाहुबलीने मतदान करण्यास नकार दिल्याने कटप्पाने बाहुबलीला मारले, असे गमतीशीर उत्तर दिले जात आहे. अशा आशयाचे पोस्टर लावलेले चित्ररथ पनवेलसह कामोठे, खारघर, कळंबोली, नावडे, तळोजा व नवीन पनवेलच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.

मतदानाला आता काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे आणि प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे अनेक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर  देण्यास सुरुवात केली आहे.

पोवाड्यांचाही जागृतीसाठी वापर
आगामी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शाहिरांची मदत घेतली जात आहे. त्यांनी जनजागृतीसाठी रचलेले पोवाडे गायले जात आहेत. पनवेल परिसरातील रस्त्यावर, चौकात चित्ररथावर लावलेल्या एलईडीतून समाज प्रबोधनात्मक चित्रफीत व ध्वनिफीत चालवून मतदानासाठीचा संदेश दिला जात आहे.

मुंबई

नवी मुंबई  - भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी दुपारपासून नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली...

08.09 PM

मुंबईः विजांच्या कडकाडाटासह सुरू झालेल्या पावसाने 29 जुलैची मुंबईकरांना आठवण करून दिली. शहरात 28.71 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 28.93...

06.36 PM

ठाणे: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल इब्राहीम कासकर याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना फोन करून...

04.24 PM