पनवेल महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणूक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यात नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेची निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून, महापालिकेत पहिलाच महापौर होण्याचा मान अनुसूचित जातीतील महिलेला मिळणार आहे. पनवेल महापालिकेची निवडणूक पार पाडण्यासाठी तांत्रित बाबी जवळपास पूर्ण झाल्या असून, मतदारांची प्रारूप यादी 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर, चंद्रपूर आणि पनवेल या सहा महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांची 27 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यावर 4 मार्च 2017 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मंगळवारी येथे दिली. ते म्हणाले, की भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर आणि चंद्रपूर या पाच महानगरपालिकांसह नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.

त्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेली विधानसभेची मतदार यादी या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

मुंबई

डोंबिवली - आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी मंडप बांधताना आड येणारा वृक्ष तोडल्याची घटना समोर आल्याने पर्यावरणप्रेमी...

02.12 PM

कल्याण : रेल्वे प्रवासात अनेक कॉलेजचे विद्यार्थी मोबाईल वर बोलत लोकलमधील दरवाज्यात उभे राहून प्रवास करतात स्टंटबाजी करतात, रेल्वे...

11.45 AM

बेलापूर - सीबीडी सेक्‍टर २१ आणि २२ मधील आयकर कॉलनीतील सिडकोने बांधलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील रहिवासी...

06.06 AM