‘नवी मुंबईसाठी पासपोर्ट कार्यालय हवे’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

बेलापूर - नवी मुंबईची लोकसंख्या १५ लाखांवर गेली आहे. शेजारच्या पनवेल, खारघर आणि उरणची लोकसंख्या १० लाखांच्या आसपास आहे. तेव्हा सुमारे २५ लाखांच्या लोकसंख्येच्या या शहरातील नागरिकांच्या सोईसाठी नवी मुंबईत पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील कार्यालयात जाण्यासाठी नवी मुंबई, पनवेल, खारघर, उरण परिसरातील नागरिकांना १५ ते ५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असे त्यांनी स्वराज यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 

Web Title: Passport Office should for Navi Mumbai