शिरसाड-अंबाडी रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य; भाविकांमध्ये नाराजी

दीपक हिरे
मंगळवार, 20 जून 2017

शिरसाड ते अंबाडी या २२किमीच्या महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले असून पुढच्या महिन्यात गुरू पौर्णिमा उत्सव सुरु होणार असूनही हे खड्डे बुजवले गेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

वज्रेश्वरी: शिरसाड ते अंबाडी या २२किमीच्या महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले असून पुढच्या महिन्यात गुरू पौर्णिमा उत्सव सुरु होणार असूनही हे खड्डे बुजवले गेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या महामार्गावर पावसाळ्या पूर्वी खूप मोठे मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनचालकांना आणि विशेष म्हणजे दुचाकी चालकांना वाहने चालविताना खूप अडचणीचे झाले आहेत,या खाड्यांमुळे रोज लहानमोठे अपघात होत आहेत. तर आजारी व्यक्तींना आणि शाळकरी मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.

चांदीप,शिरवली,ऊसगाव,वज्रेश्वरी झिडके या ठिकाणी तर खूप मोठया प्रमाणात खड्डे आहेत. महत्वाचे म्हणजे या रस्त्यावर वज्रेश्वरी हे प्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणी खूप पर्यटक येत असतात, पण येथील सरकारी दवाखान्याजवळच मोठे खड्डे पडले आहेत. आता पुढील महिन्यात संपूर्ण राज्यभरातून भाविक गणेशपुरीत नित्यानंद स्वामी दर्शनासाठी येतील. असे असूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे स्थानिक ग्रामपंचायत, प्रशासन आणि देवस्थान कमिटीने लक्ष दिलेले नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही