खुटखाडी पुलाच्या नुतनीकरण कामाबाबत संशयास्पद परिस्थीती

अच्युत पाटील
शनिवार, 9 जून 2018

बोर्डी - बातमीदार अच्युत पाटील, झाई-डहाणू मार्गावरील बोर्डी-घोलवड गावाच्या सिमेवरील खुटखाडी पुलाचे नुतनीकरण आणि डहाणू पारनाका ते झाई गावाला जोडणारा मार्गाचे डांबरीकरण करणे कामी सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणू कार्यालय अधिकाऱ्यांनी आचारसहितेचे कारण पुढे करून बंद करण्यामागे त्यांची भुमिका संशयास्पद असल्याचा आरोप ठाणे जिल्हा परिषदेचे तात्कालीन बांधकाम विभाग सभापती व माजी सरपंच विजय म्हात्रे यांनी केला.

 2012 साली खुटखाडीवरील पुलाचे नुतनीकरण कामी सत्तर लक्ष रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली होती. तसेच डहाणू पारनाका ते झाई पर्यंत पंधरा किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी तीन कोटी ऐशी लक्ष रुपयांचा निधी मंजुरी मिळाल्या नंतर कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते परंतु बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यानी ग्रामस्थांना टोलवाटोलवीची उत्तर देवून अंधारात ठेवले असा आरोप करून म्हात्रे पुढे म्हणाले.

घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्र ते टोकेपाडा पर्यंत रस्त्यावर काँक्रिटी करण्यासाठी महिनाभर रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागणार होती. म्हणून दहावी, बारावीच्या शालांत, व शाळेच्या परिक्षा पार पडल्यावर सुट्टी काळात काम हाती घेण्यात येईल असे सांगितले होते. परंतु डहाणू औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी राख वाहतूकदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकऱ्यांनी संगनमत करून कामात खोडा घातला असा धडधडीत आरोप केला.

या प्रकरणी लोकप्रतिनिधी देखील बोटचेपे धोरण अवलंबत असल्याने कुठेतरी पाणी मुरत असावे असा संशय येत आहे.असे सांगून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Pay attention to the renewal of bridges - Srinivas Vanaga