उल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निःशब्द सन्नाटा

दिनेश गोगी
गुरुवार, 26 एप्रिल 2018

उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील अजातशत्रू म्हणून ओळखले जाणारे बंडू देशमुख यांची संपूर्ण शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीला पंधरवाडा होऊन गेले असतानाच, देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणारा एकही कटाऊट किंबहूना बोर्ड शहरात झळकलेला नाही.त्यामुळे मनसेत कमालीचा निःशब्द सन्नाटा पसरल्याचे चित्र उल्हासनगरात दिसू लागले आहे.यामागे अध्यक्ष निवडीचे नकारात्मक पडसाद असल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील अजातशत्रू म्हणून ओळखले जाणारे बंडू देशमुख यांची संपूर्ण शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीला पंधरवाडा होऊन गेले असतानाच, देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणारा एकही कटाऊट किंबहूना बोर्ड शहरात झळकलेला नाही.त्यामुळे मनसेत कमालीचा निःशब्द सन्नाटा पसरल्याचे चित्र उल्हासनगरात दिसू लागले आहे.यामागे अध्यक्ष निवडीचे नकारात्मक पडसाद असल्याचे बोलले जात आहे.

मनसे वाढावी या सकारात्मक उद्देशाने इतर शहरांप्रमाणे उल्हासनगरातही पूर्वेला प्रदीप गोडसे व पश्चिमेला संजय घुगे असे दोन अध्यक्ष करण्यात आले होते.अलीकडे हा दोन अध्यक्षांचा पायंडा खंडित करून एकाच अध्यक्षाची निवड करून त्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.आणि ज्यांच्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगरातील अनेक पालिका शाळांना झळाळी मिळाली,शाळा क्रमांक 13-14 ची तीन मजली इमारत डौलाने उभी राहिली.आणि लक्षवेधक म्हणजे महाराष्ट्रातील पहिलीच आणि उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेली अत्याधुनिक वातानुकूलित अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर अभ्यासिका पूर्णत्वास आली,त्यासाठी खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकण्यात आली.

बंडू देशमुख हे समाजकारण आणि राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जात असले तरी,शहरातील प्रमुख मनसे बॉडीतील बहुतांश या निवडीवर नाखूष आहेत.ज्यारीतीने शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी,युथ आयकॉन ओमी कलानी,रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांच्याकडे फेसरीडिंग-मॅन-मसल पॉवर आहे.हे स्वखर्चाने विविध उपक्रम राबवू शकतात,आंदोलनकर्त्यांना जामिनावर सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

असाच फेसरीडिंग-मॅन-मसल पॉवर चा चेहरा मनसेला मिळावा.अशी बहुतांश जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा होती.सचिन कदम,संजय घुगे,प्रदीप गोडसे यांनी अध्यक्षपदाचा टर्म हाताळला आहे.त्यात प्रदीप गोडसे यांनी जेव्हढे लोकपयोगी,आणि मनसेचा ठसा उमटवणारे कार्यक्रम घेतले.दुसरीकडे उल्हासनगर पालिकेत मनसे कामगार संघटनेचे जोमात काम करणारे,स्वतःची आगळीवेगळी बडदास्त ठेवणारे, वाल्मिकी समाजाची ऐतिहासिक जयंती स्वखर्चाने करून मनसेच्या कार्याचा नावलौकिक करणारे,कामगारांना न्याय मिळवून देणारे आणि फेसरीडिंग-मॅन-मसल पॉवरची सांगड असणारे पालिकेतील युनिट अध्यक्ष तथा मनसे शहर उपाध्यक्ष दिलीप थोरात यांच्या नावाला शहर अध्यक्षपदासाठी अनुकूल वातावरण दिसत होते.तशी अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली होती.

मात्र इथे आजी-माजी अध्यक्षांच्या समन्वयाचा अभाव आणि कुणीच एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास तयार नसल्याने दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ मिळाला तो ऐनवेळी अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेल्या बंडू देशमुख यांना.कोणत्याही वादात पडण्याऐवजी शाळांच्या समस्या सोडवणे देशमुख यांच्या पथ्यावर पडले.

पण 10 एप्रिलला राज ठाकरे यांनी बंडू देशमुख यांची अध्यक्षपदी निवड केली. निवडीला तब्बल पंधरवाडा उलटून गेला असतानाच,उल्हासनगरात एकही शुभेच्छांचा कटाऊट किंबहूना बोर्ड दस्तुरखुद्द बंडू देशमुख वा त्यांच्या समर्थकांनी अथवा जेष्ठ सवंगड्यांनी झळकवलेला नाही. लहान सहान होणारे कार्यक्रम देखील मंदावले आहेत.

याबाबत बंडू देशमुख यांच्याशी विचारणा केली असता,कटाऊट किंवा बोर्डवर पैसा खर्ची करण्याऐवजी या पैशांचा वापर लोकोपयोगी कामासाठी लावा.हा संदेश आमचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा आहे.त्यामुळे शोबाजी पासून अलिप्त आहे.निवडीचे नकारात्मक पडसाद नसून आम्ही एकत्र आहोत.लवकरच मनसेत नवचैतन्य दिसणार.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: peace in maharashtra navnirman sena in ulhasnagar