पेण बस स्थानकात ज्येष्ठाचे आठ लाख रुपये लांबविले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पेण - पेण बस स्थानकात एका ज्येष्ठाकडील आठ लाखांची रक्‍कम आज दुपारी चोरट्यांनी लांबविली. या चोरीत महिलांच्या टोळीचा समावेश असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त आहे. पनवेल येथील अब्दुल अधिकारी हे ज्येष्ठ नागरिक एसटीने पनवेलहून पेण येथे आले होते. त्यांना नागोठणे येथे जाण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास बसमध्ये चढत होते. त्या वेळी त्यांच्या हातातील पिशवी कापून चोरट्यांनी त्यातील सुमारे आठ लाख रुपये पळविले. बसमध्ये बसल्यानंतर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. हे प्रकरण एसटीवाहक व चालकांना कळताच त्यांनी ही माहिती अधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर व उपनिरीक्षक गणेश माने यांनी बसमधील प्रवाशांची तपासणी केली. दरम्यान, या बसमध्ये चढण्यासाठी काही महिला संशयास्पदपणे घाई करत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.