पेंग्विन देखभालीसाठी १२ कोटींचे कंत्राट

पेंग्विन देखभालीसाठी १२ कोटींचे कंत्राट

मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणी बाग) दीड वर्षांपूर्वी दाखल झालेल्या पेंग्विनच्या देखभाल, पालनपोषणाची जबाबदारी आता खासगी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. यासाठी तीन वर्षे कालावधीच्या १२ कोटी खर्चाच्या प्रस्तावास मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. भाजपचा विरोध डावलून सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव रेटून नेला.

प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून आठ हॅम्बोल्ट पेंग्विन आणले होते. यातील एका पेंग्विनचा काही दिवसांपूर्वी आणि भारतात प्रथमच जन्मलेल्या पेंग्विन पिल्लाचा २० दिवसांपूर्वी मृत्यू झाला. पालिकेकडे देखभालीसाठी पुरेसे कर्मचारी  नसल्याने कंत्राटदार नेमला आहे. पेंग्विनसाठी कक्ष आणि क्वारंटाईन कक्ष बनवले आहेत. पेंग्विन कक्ष वातानुकूलित आहे. त्यात पेंग्विनला खाण्यासाठी माशांचा पुरवठा, जीवरक्षक यंत्रणा, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा, विद्युत यंत्रणा इत्यादी पुरविण्यांसाठी तीन वर्षांसाठी मे. हायवे कन्स्ट्रक्‍शन कंपनीची निवड केली आहे. कामातील अनियमिततेबाबत १० लाखांचा दंड ठोठावलेल्या कंत्राटदारालाच हे कंत्राट दिल्यामुळे भाजपने आक्षेप घेतला आहे. हे कंत्राट कोणत्या निकषावर दिले? कंत्राटदाराचा त्यातला अनुभव किती? आदी प्रश्‍न भाजप आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केले. 

महिन्याला १६ किलो मासे
राणीबागेतील पेंग्विनला दरदिवशी ४५० ते ५०० ग्रॅम रावस, तारली, बोंबिल आणि ईल आदी प्रकारचे मासे खायला दिले जातात. महिन्याला सातही पेंग्विन १५ ते १६ किलो मासळीचा फडशा पाडतात. त्यांना आवडणारे बोंबील जास्त प्रमाणात दिले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com