'फिलोरी'विरोधात तक्रारीबद्दल दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई - 'फिलोरी' या चित्रपटातील कथानक चोरलेले असून, संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका गायत्री सिनेप्रॉडक्‍शनचे प्रतिनिधी गायत्री आणि दशरथ राठोड यांनी उच्च न्यायालयात केली होती. ही याचिका फेटाळत याचिका दाखल केल्याबद्दल पाच लाख रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला.

चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा बाकी असताना त्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत होती. शनिवारी दाखल केलेल्या याचिकेत प्रतिवादी फॉक्‍स स्टार स्टुडिओ, "फिलोरी'तील कलाकार, निर्माती अनुष्का शर्मा, तिचा भाऊ कर्नेश व त्याची कंपनी क्‍लीन स्टेट फिल्म आणि लेखिका अन्विका दत्ता गुप्तान यांना सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी नोटीस देऊ, तोपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन रोखावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील नागेश मिश्रा यांनी केली.

याचिकाकर्त्यांचे काहीही म्हणणे ऐकून घेण्यास न्यायाधीश गौतम पटेल यांनी नकार दिला. केवळ न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासाठी अशा याचिका दाखल केल्या जातात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. याचिकेवर काहीही सुनावणी न घेता ती फेटाळत याचिकाकर्त्यांना त्यांनी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Web Title: phillauri movie oppose complaint fine