म्हाडाच्या नावाने लाखोंची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

अटक केलेल्या चौघांची अधिक चौकशी केल्यानंतर घंटाळी मंदिर येथे त्यांनी तात्पुरते कार्यालय उघडले असल्याचे समोर आले. त्या कार्यालयात म्हाडाची बनावट कागदपत्रे तयार करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, म्हाडाचा लोगो असलेली बनावट कागदपत्रे, म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचे रबरी स्टॅम्प, म्हाडाची घरेवाटप यादी आदी कागदपत्रे सापडली, असे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

ठाणे - म्हाडाची बनावट कागदपत्रे तयार करून व अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट रबरी स्टॅम्प वापरून अनेक नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. या संशयितांनी अनेकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. सुहास बाळकृष्ण पाटील, प्रणव विलास पाटील, दीपेश अशोक आंगणे व प्रीतम अरुण पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

भाईंदर येथील लक्ष्मण पालकर (41) यांना त्यांचे मित्र जगन्नाथ देसाई यांच्या परिचयाचा म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगणारा मुख्य आरोपी सुहास याने पालकर यांना तुळशीवाडी, ताडदेव; मुंबई येथे म्हाडाच्या रोझा महलमध्ये गाळा मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केली. 2006 ते 2007 च्या दरम्यान त्यांच्याकडून 12 लाख 50 हजार रुपये घेऊन म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचे कागदपत्र देऊन फसवणूक केली. हा प्रकार पालकर यांच्या लक्षात आल्यानंतर सुहास त्यांना टोलवाटोलवी करीत होता. त्यावर सुहास हा ठाण्यातील हरी निवास सर्कल येथे येणार असल्याची माहिती पालकर यांना मिळाली होती. त्यानुसार पालकर यांनी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पोफळे यांना माहिती देऊन आरोपीचे वर्णन सांगितले. दरम्यान, पोलिसांनी चौकशी करून सुहास व त्याचे सहकारी प्रणव, दीपेश व प्रीतम यांना ताब्यात घेतले.

घंटाळीत कार्यालय
अटक केलेल्या चौघांची अधिक चौकशी केल्यानंतर घंटाळी मंदिर येथे त्यांनी तात्पुरते कार्यालय उघडले असल्याचे समोर आले. त्या कार्यालयात म्हाडाची बनावट कागदपत्रे तयार करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, म्हाडाचा लोगो असलेली बनावट कागदपत्रे, म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचे रबरी स्टॅम्प, म्हाडाची घरेवाटप यादी आदी कागदपत्रे सापडली, असे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

मुंबई

मुंबई : प्रदूषण नियंत्रण आणण्याचे आव्हान खूप मोठे आहे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न...

02.48 PM

कल्याण : दोन दिवसानंतर गणपती बाप्पाचे आगमन होणार असून त्यापूर्वी डोंबिवलीकराना डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकपरिसरमधून केडीएमटी...

02.39 PM

कल्याण : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसावंर येऊन ठेपले  असल्याने सर्वत्र  उत्साह ओसांडून वाहात आहे. त्यात...

01.57 PM