नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना गंडवणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

ठाणे : कुवेत, दुबईत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दुकलीला ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 142 पासपोर्ट, बनावट व्हिसा, जेट एअरवेज विमानाचे बनावट तिकीट असा ऐवज जप्त केला. जप्त पासपोर्टमध्ये नेपाळी लोकांचे पासपोर्ट सापडल्याने यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

राबोडीतील नुरुल महमद हदीस हुदा अन्सारी (वय 35) आणि महमद सलीम सहेमदअली शहा (वय 38) अशी अटक आरोपींची नावे आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये नुरुल अन्सारी याने उत्तर प्रदेशातील तसऊर अब्दुल्ला अली (वय 29) याच्यासह त्याचे मित्र हसहाक खान, औरंगजेब खान, संजय, अवधेश, हरी महाराजगंज यांना परदेशातील हॉटेलमध्ये हेल्परमध्ये नोकरीचे आमिष दाखविले. तेथे जाण्यासाठी व्हिसा, विमान तिकीट व मेडिकलसाठी प्रत्येकी 80 हजारांची मागणी केली. त्यांनी त्याला चार लाख 80 हजार रुपये दिल्यानंतर या दुकलीने त्याचे पासपोर्ट घेऊन त्यांना कुवेतचा एकाच क्रमांकाचा बनावट व्हिसा देत फसवणूक केली.

याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या तपास पथकाने या दोघांना अटक केली. त्या वेळी त्यांच्याकडून मुदत संपलेले पासपोर्ट सापडले. त्याच पासपोर्टवरील फोटो काढून दुसऱ्याचे फोटो लावत असल्याचे तपासात उघड झाले. या दोघांना 26 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

मुंबई

कुलगुरू, शिक्षण मंत्र्यांवर आरोप मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाला कुलगुरू आणि राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना...

05.03 AM

धारावी : नातू मानलेल्या 15 वर्षांच्या शेजारच्या मुलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धारावीतील एक आजीबाई शीव रुग्णालयात...

04.03 AM

खड्डे न बुजविल्याने कारवाई; 306 कोटी रुपये वसूल करणार मुंबई: गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यास...

03.03 AM