भिवंडीत रिक्षाचालकाची पोलिसाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

भिवंडी - भिवंडी-कल्याण रोडवर भादवड नाका येथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला मुजोर रिक्षाचालकाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. 19) घडली. या प्रकरणी रिक्षाचालक महेंद्रप्रताप सिंग याच्याविरोधात शांतीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

भिवंडी शहरातील कल्याण रोडवर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असते. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी भिवंडी वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार कृष्णा धाऊ वरठा हे कर्तव्यावर होते. त्या वेळी रिक्षाचालक महेंद्रसिंग हा वाहतुकीस अडथळा निर्माण करत होता. हवालदार वरठा यांनी जाब विचारला असता, महेंद्र सिंगने शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: police beating by rickshaw driver crime