मुंबईत स्वबळ म्हणजे ताकदीचा आखाडा

दीपा कदम - सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

शिवसेना-भाजपसाठी ही केवळ निवडणूक ठरणार नसून एकमेकांचे बळ दाखविण्यासाठीचा आखाडा असणार असल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे.

मुंबई - राजकीय ताकद दाखविण्यासाठी शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिकेतील युती तोडली असून, या स्पर्धेत जो जिंकेल तो सामर्थ्यवान ठरणार आहे. शिवसेना-भाजपसाठी ही केवळ निवडणूक ठरणार नसून एकमेकांचे बळ दाखविण्यासाठीचा आखाडा असणार असल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. आर्थिक राजधानीवर स्वतंत्र झेंडा फडकावणे म्हणजे वाढलेल्या राजकीय ताकदीवर शिक्‍कामोर्तब होणार आहे.

शिवसेना-भाजपची युती विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेतही तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत रंग भरण्यास सुरवात झाली आहे. महापालिका निवडणुकीत प्रमुख स्पर्धक शिवसेना आणि भाजपच राहावेत आणि प्रचाराची सूत्र या दोन्ही पक्षांभोवती फिरत राहून, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत वापरलेली रणनीती मुंबई महापालिकेसाठीही वापरली जात आहे. याविषयी मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुरेंद्र जोंधळे यांनी सांगितले, की कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीप्रमाणे निवडणुकीनंतर सत्तेत एकत्र येण्याचा पर्याय कायम असणार आहे. निवडणुकीनंतर युती झाल्यानेही काही फरक पडणार नाही. यापूर्वी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणुका लढविल्या आणि मग नंतर सत्तेत आलेच आहेत. प्रश्‍न आता सर्वाधिक जागा शिवसेना जिंकणार की भाजप, हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबतीत हे दोन्ही पक्ष अतिरेकी महत्त्वाकांक्षी आहेत, हे युती तुटल्याने स्पष्ट होत आहे. युती तोडल्याचा दोन्ही पक्षांना तोटा आणि फायदा होणार आहे. शिवसेनेला सत्ताविरोधी जनमताचा फटका नक्‍कीच बसू शकतो. कारण पाच वर्षांपूर्वीचे आणि आताचे मुंबईचे सामाजिक प्रवाह बदलले आहेत, त्यामुळे भाजपबरोबर असती तर त्याचा फायदा शिवसेनेला झाला असता.

निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमधील या राजकीय स्पर्धेतून वाढलेले राजकीय बळ, नेतृत्वावर शिक्‍कामोर्तब यासाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपसाठी ही योग्य संधी आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता असणे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षासाठी ही योग्य वेळ ठरणार आहे, ती भाजपने साधल्याचे मतही जोंधळे यांनी व्यक्‍त केले.

शिवसेनेप्रमाणे भाजपचे राजकीय बळ मुंबईच्या कानाकोपऱ्यांत नाही. त्यामुळे कदाचित त्यांना उमेदवार आयात करावे लागतील; त्यामुळे युती टिकवण्याचा त्यांनीही प्रयत्न करायला हवा होता.
- प्रा. सुरेंद्र जोंधळे, मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख

मुंबई

कल्याण - नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात गेलेली मराठी कुटूंब आजही आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत....

06.24 PM

मुंबई : घाटकोपर येथील इमारत दुर्घटना प्रकरणाची चौकशी करून संबंधित अहवाल आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर...

04.30 PM

मुंबई - वर्षभर आपले कुटुंबिय आणि देशासाठी लढणाऱ्या आपल्या पती राजांची आणि कुटुंबियांची सक्षम पणे सांभाळ करणाऱ्या त्या पत्नी...

04.24 PM