शिवसेनेतर्फे पोस्टमनना टॉवेल आणि टोप्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

कल्याण - ऊन, वारा, पाऊस सहन करत आपल्या घरापर्यंत पत्रे पोहाचवणाऱ्या सर्वांच्या लाडक्‍या पोस्टमनकाकांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी शिवसेनेने त्यांना टॉवेल आणि टोप्या दिल्या.

संपूर्ण जगात सोशल मीडियाचा बोलबाला आहे. काही वर्षांपर्यंत दुर्गम भागात एखादी बातमी किंवा निरोप तसेच पत्र मजलदरमजल करत घरोघरी घेऊन येणाऱ्या पोस्टमनकाकांना आपण विसरत चाललो आहोत. त्यांची आठवण ठेवत या काकांसाठी शिवसेना युवा सेना पारनाकाचे पदाधिकारी देवेंद्र माने यांनी त्यांना टोप्या आणि टॉवेल देऊन त्यांचे आभार मानले. 

या कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्यांनी पोस्टमनकाकांचे कौतुक केले. युवा सेनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कार्यक्रमास कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक प्रकाश पेणकर, श्रेयस समेळ, सुधीर बासरे, विजय काटकर, विद्याधर भोईर, उपशहरप्रमुख रवी पाटील, पोस्ट अधिकारी संजय लिये आणि पोस्टाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Postman give Towels and Hats by Shivsena