मराठा सेवा संघाची उत्तर भारताची धुरा प्रदीप पाटील यांच्यावर

Mumbai
Mumbai

मुंबई : दिल्लीतील व्यावसायिक प्रदीप पाटील यांची मराठा सेवा संघाच्या उत्तर भारत कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच दादर येथे पार पडली. या बैठकीत प्रदीप पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एकेकाळी अटकेपार झेंडा रोवलेल्या मराठ्यांच्या साम्राज्यात म्हणजेच उत्तर भारतात मराठा सेवा संघाचे कार्य वाढविणे हा मुख्य अजेंडा बैठकीत चर्चेत आला. त्यासाठी उत्तर भारताचे कार्याध्यक्ष म्हणून प्रदीप पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मु काश्मीर प्रदेशात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठीजनांना एकत्र करण्याची जबाबदारी प्रदीप पाटील यांच्यावर आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर गलई व्यावसाय करणारा मराठी समाज आहे. त्यांच्या हितासाठी प्रदीप पाटील यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. गणेशोत्सव, दिवाळी, दसरा दरम्यान सांस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचं दर्शन दिल्लीकरांना करून देण्याचं काम ते करत आहेत.

या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, राष्ट्रीय सचिव कमलेश पाटील, शिवाजीराजे पाटील, सौरभ खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, प्रवीण पाटील व राज्यातील सर्व जिल्ह्यातून अध्यक्ष तसेच देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com