27 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपाताची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - बाळंतपणात महिलेच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन 27 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिली. 37 वर्षांच्या या गर्भवतीच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये गर्भातील बाळाची अपूर्ण वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. नऊ महिन्यांनंतर बाळाला जन्म दिल्यास बाळंतपणात महिलेच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तवली होती. त्याआधारे तिने गर्भपात करण्याची परवानगी देण्याची मागणी एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली होती. खंडपीठाने त्या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी दिली. हा गर्भपात जे. जे. रुग्णालय किंवा अन्य सरकारी रुग्णालयात करावा. खासगी रुग्णालयात करू नये, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.
Web Title: pregnant women permission to abortion