समन्वयाचा श्रीगणेशा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुंबई - गणेशोत्सवासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मंडप उभारण्यापासून वीजजोडणीपर्यंतच्या परवानगी नमुना अर्ज आणण्यासाठी विविध यंत्रणांच्या कार्यालयांच्या फेऱ्या घालाव्या लागतात; मात्र आता बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने आणलेल्या "समन्वय श्रीगणेशा‘ या ऍपवर हे अर्ज ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांची होणारी पायपीट वाचणार आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 9) या ऍपचे लोकार्पण होणार आहे. 

मंडप उभारणे, वीजजोडणी आदी कामांसाठी परवानगी अर्ज आणण्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाणे, पालिका कार्यालय, वाहतूक विभाग, बेस्ट किंवा रिलायन्सच्या कार्यालयात जावे लागते; मात्र आता हे अर्ज या ऍपवरच उपलब्ध होणार असल्याने या पदाधिकाऱ्यांना होणारा त्रास वाचणार आहे, असे समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले. 

अपडेटेड डाटा मिळणार 

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती ही मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवांची शिखर संस्था आहे; मात्र या समितीकडे आजपर्यंतचा शहरातील मंडळांचा अपडेटेड डाटा उपलब्ध नव्हता. या ऍपमुळे समितीकडे तो डाटा जमा होईल. 

ऍपविषयी... 

- मंडळांना गुगल प्ले स्टोअरवरून हे ऍप डाऊनलोड करावे लागेल. 

- त्यावर मंडळाचे नाव, पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर, मंडळाचा नोंदणी क्रमांक, मंडळाचा मेल आयडी आदी माहितीची नोंद करावी लागेल. 

- त्यानंतर संबंधित विभागांचे अर्ज भरता येतील. 

- मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही त्यावर देता येईल. 

मुंबई

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्द आणि ग्रामीण भागात मागील 24 तासांत 151 मिमी पाऊस पडूनही कल्याण पूर्वमधील...

06.48 PM

वाडा - पालघर जिल्ह्यातील वाडा येथे शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरांडा गावाजवळील घोडमाळ-बोरांडा रस्ता...

05.51 PM

कल्याण : कल्याण -नेवाळी विमानतळाच्या जागेवरून गुरुवारी नेवाळी परिसरात हिंसक आणि उग्र आंदोलन छेडण्यात आले होते. या...

04.21 PM