कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने गौरव

pride for the prestigious womens Navadurga award
pride for the prestigious womens Navadurga award

ठाणे - दांडियाच्या जल्लोषासोबतच सामाजिक भान जपण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करत असून ‘डोंबिवली रासरंग दांडिया 2018 च्या निमित्ताने रविवारपासून नऊ कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. रासरंग दांडियासोबतच नवदुर्गा पुरस्काराचेही हे दुसरे वर्ष असून दररोज दोन महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

खा. डॉ. श्रीकांत शिंदे आयोजित ‘डोंबिवली रासरंग’ हा ठाण्यापुढील झपाट्याने वाढणाऱ्या उपनगरांमधील सर्वात मोठा दांडिया असून डोंबिवली पूर्व येथील धनाजी नाना चौधरी विद्यालयाच्या भव्य पंटागणावर त्याचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी प्रथमच आयोजित या उपक्रमाला डोंबिवलीकरांप्रमाणेच ठाण्यापासून अंबरनाथपर्यंतच्या तब्बल एक लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली होती. यंदाही जल्लोषात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दांडिया फेम मनीषा सावला यांची धम्माल गाणी आणि बिपिनचंद्र चुनावाला यांच्यासह पार्थ गांधी, सिद्धेश जाधव, वाचा बिपिन आदींच्या गाण्यांच्या तालावर नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहपूर्ण वातावरणात डोंबिवलीकर थिरकणार आहेत.

शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी उपस्थित राहाणार आहेत. याबरोबरच मराठी–हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या दांडिया उपक्रमासाठी उपस्थित राहाणार आहेत. सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आयुष शर्मा आणि वरिना हुसेन या ‘लवयात्री’ चित्रपटातील हिट जोडीने गुरुवारी या उपक्रमाला उपस्थिती लावत सळसळत्या तरुणाईबरोबर थिरकण्याचा आनंद घेतला. 

सोमवारी ‘राजन’ या आगामी मराठी सिनेमातील लोकप्रिय कलाकार राकेश बापट, मीनल पाटील, किशोरी शहाणे आदी लोकप्रिय कलावंतही उपस्थित राहाणार आहेत.

या सोहळ्यात स्त्रियांसाठी मराठमोळ्या संस्कृतीने बहरलेला भोंडला हा खेळ खेळला जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमाला जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, आमदार सुभाष भोईर, महापौर विनिता राणे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, महिला संघटक कविता गावंड, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे, भाऊसाहेब चौधरी आदींचे सहकार्य लाभले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com