मोदींनी केले आदित्य ठाकरे, सचिनचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन या दोघांचं कौतुक केले. मोदी म्हणाले, “माझा तरुण मित्र आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभागी होऊन, मुंबईत साफसफाई केली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.”

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन या दोघांचं कौतुक केले. मोदी म्हणाले, “माझा तरुण मित्र आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभागी होऊन, मुंबईत साफसफाई केली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.”

आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी आज सकाळी स्वत: झाडू हाती घेऊन मुंबईत स्वच्छता केली. मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात सचिन तेंडुलकरने मुलासह सहभाग घेतला. या सर्वांनी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात साफसफाई केली. प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने केले.

आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी स्वत: ट्विट करुनही, स्वच्छतेचे संदेश दिले होते.