खासगी डॉक्‍टरांची संपातून माघार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खासगी डॉक्‍टरांनी संपातून माघार घेतल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शुक्रवारी (ता. 24) दिली.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खासगी डॉक्‍टरांनी संपातून माघार घेतल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शुक्रवारी (ता. 24) दिली.

निवासी डॉक्‍टरांच्या संपात बुधवारी (ता. 22) "आयएमए'चे डॉक्‍टरही सहभागी झाले होते. पॅथॉलॉजी, खासगी दवाखाने, रेडिओलॉजी, छोटी रुग्णालये, नर्सिंग होममधील डॉक्‍टरही संपावर गेल्याने रुग्णांचे हाल होत होते; परंतु मुख्यमंत्री फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने खासगी डॉक्‍टर संपातून माघार घेत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिशएनचे अध्यक्ष डॉ. पार्थिव संघवी यांनी सांगितले.