प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येण्याची गरज : माजी न्यायमूर्ती 

प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येण्याची गरज : माजी न्यायमूर्ती 

खारघर : सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेली अनेक आश्वासने प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित प्रश्नासाठी प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित येवून संघर्षांची गरज असल्याचे मत निवृत्त न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे यांनी खारघर येथे व्यक्त केली. भारतीय नागरिक मंचच्या वतीने शनिवार (ता.13) प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पाला पाच दशकांचा कालावधी लोटला आहे. मात्र आजही सिडको विरोधात अनेक खटले सुरु आहेत. सिडकोने दिलेली आश्वासने हवेत विरली असून 1970 साली संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला आजही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. सिडकोच्या दुर्लक्षामुळे गावातील समस्या वाढत चालल्या आहेत. गरजेपोटी घरांचा प्रश्न देखील यामुळेच निर्माण झाला आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी अॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी भारतीय नागरिक मंचची स्थापना केली आहे. 

निवृत्त न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे समस्या व अडचणी संदर्भात बोलताना म्हणाले, सिडको विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. तर सुरेश ठाकूर यांनी यावेळी सिडकोने कशाप्रकारे प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. सिडकोने खारघर सारख्या शहरात धनधांडग्यासाठी कोट्यवधी खर्च करून गोल्फ कोर्स उभारले मात्र ज्यांच्या जमिनी संपादित केल्या त्या प्रकल्पग्रस्तासाठी एक मैदान उभारले नाही हि शोकांतिका आहे. नैना च्या नावाखाली सिडको अनेक शेतकऱ्यांच्या 40 टक्के जमिनी घेणार आहे. हा उघडपणे सुरु असलेली फसवणूक असून या विरोधात पेटून उठण्याची गरज आहे. असेही त्यांनी सांगितले. या मार्गदर्शन शिबिराला निवृत्त सरकारी कामगार अधिकारी अरुण सावळकर, अॅडव्होकेट प्रियांका ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक अजीज पटेल, नवी मुंबई महानगर पालिकेचे रमाकांत पाटील, माजी उपसरपंच संतोष गायकर, वर्तेकर, गोटीराम तोडेकर, शिवदास गायकर, रोहिदास गायकर, मदन पवार, कृष्णा ठाकूर, हरिश्चद्र  ठाकूर, शंकरशेठ ठाकूर, शांतारामी पाटील, संतोष तांबोळी, सुधाकर तोडेकर, दिलीप ठाकूर, अरुण ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com