परदेशी रुग्णांसाठी "प्रोटोकॉल' हवा - डॉ. सावंत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई - परदेशातून उपचारांसाठी येणाऱ्या काही खास रुग्णांबाबत प्रोटोकॉल असला पाहिजे. रविवारी होणाऱ्या प्रोटोकॉलच्या बैठकीत याबाबत विषय मांडणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी दिली. 

जगातील सर्वांत लठ्ठ अशी ओळख असलेली इजिप्तची ईमान अहमद हिच्यासाठी तिच्या बहिणीने डॉक्‍टरांशी संपर्क साधला. त्यानंतर सैफी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी पुढाकार घेऊन तिला मुंबईत उपचारांसाठी आणले. त्यानंतर ईमानची बहीण शायमा हिने केललेल्या आरोपानंतर त्यात राज्य सरकारला हस्तक्षेप करावा लागला. अशा तऱ्हेचे रुग्ण जेव्हा भारतात येतात, तेव्हा त्यासाठी नेमकी काय पद्धती असावी, रुग्णालय आणि रुग्णांसाठी काय अटी असाव्यात याबाबत शिष्टाचार निश्‍चित करण्याची आवश्‍यकता आहे का, असा प्रश्‍न माध्यमांनी विचारला असता, डॉ. सावंत यांनी अशा "प्रोटोकॉल'ची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. तसेच यासाठीची कार्यप्रणाली निश्‍चित व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. ईमानच्या प्रकरणानंतर किंवा तिच्या बहिणीने केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील "वैद्यकीय पर्यटना'वर परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.