"प्रसिद्धी हा गौण विषय'; संमेलनाध्यक्षकांची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

डोंबिवली : येथील पु. भा. भावे साहित्यनगरीमध्ये सुरू असलेल्या 90 व्या साहित्या संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी सकाळच्या फेसबुक पेजद्वारे दिलेल्या लाईव्ह मुलाखतीमध्ये साहित्यिकांचे साहित्य हे तात्कालिक नसून पिढ्यान पिढ्या टिकणारे असते असे सांगत, प्रसिद्धी हा माझा उद्देश नसून साहित्यिकांसाठी प्रसिद्धी हा गौण विषय आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केले.

डोंबिवली : येथील पु. भा. भावे साहित्यनगरीमध्ये सुरू असलेल्या 90 व्या साहित्या संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी सकाळच्या फेसबुक पेजद्वारे दिलेल्या लाईव्ह मुलाखतीमध्ये साहित्यिकांचे साहित्य हे तात्कालिक नसून पिढ्यान पिढ्या टिकणारे असते असे सांगत, प्रसिद्धी हा माझा उद्देश नसून साहित्यिकांसाठी प्रसिद्धी हा गौण विषय आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केले.

संमेलनातील "सकाळ प्रकाशन'च्या दालनाला काळे यांनी आज भेट दिली. यावेळी फेसबुक पेजद्वारे लाईव्ह मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, "मी हेडलाईनसाठी भाषण करत नाही. तर माझे विचार लोकांपर्यंत पोहचणे महत्त्त्वाचे आहे. पुढील वर्षभरात मी मराठी भाषा, मराठी साहित्य आणि संस्कृती यांचं संवर्धन करण्यासाठी काम करणार आहे. मराठी भाषा महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राबाहेरही बोलली जाते. काही साहित्यसंस्था महाराष्ट्राबाहेर मराठीच्या संवर्धनासाठी काम करत आहेत, त्यांच्या कामाला आणखी वेग यावा म्हणून मी प्रयत्न करणार आहे.'

मुलाखतीतील एका प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, "भाषेसमोरील प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. जर वर्तमान पिढी मुळातच मराठी भाषा शिकली नाही; तर या पिढीला नंतर मराठी भाषा शिकवणे अवघड जाईल. त्यामुळे पूर्वप्राथमिक अवस्थेपासून काय करता येईल, याचा विचार करणार आहे. पुढील काळात वेगवेगळ्या विद्यापीठांच्या मराठी भाषा विभागांना भेट देऊन त्यांच्या सहकार्याने भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्रमात यादृष्टीने काय बदल करता येतील यावरही लक्ष देणार आहे', असे त्यांनी सांगितले.

"सकाळ प्रकाशन'च्या दालनात दर्जेदार पुस्तके
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथग्राममध्ये यंदा 365 ग्रंथदालने आहेत. यात "सकाळ प्रकाशन'च्या दालनात "सकाळ वाचक महोत्सव 2017' ची विविध दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. "जीएसटी कायदा' हे पुस्तकही दालनात उपलब्ध आहे.

 

मुंबई

बेलापूर - जुईनगर सेक्‍टर २२ मधील रेल्वे वसाहतीत डेंगीचे १२ संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर नेरूळमधील डॉ. डी. वाय....

03.45 AM

कल्याण - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यात बाधित होणारी प्रार्थनास्थळे हटवण्याची मोहीम कल्याण-...

03.15 AM

बेलापूर - उरण रोडवरील बेलापूर जंक्‍शन - तरघर या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास तीन अवजड वाहने आणि एनएमएमटीची बस...

03.03 AM