मुंबईकडे जाताना वाहतूक कोंडी; वाशी पुलाची लोखंडी जाळी तुटली

अमित गवळे
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

वाशी पासून ते वाशी खाडी पुलावर पोहचेपर्यन्त पन्नास मिनिटे लागली. वाहतूक कोंडी असूनही टोल नाक्यावर टोल वसूली सुरूच होती. त्यामुळे वाःतुकीचा वेग अधिक मंदावला होता. अशा वेळी काही काळ टोलवर सूट देणे गरजेचे होते.
- प्रकाश मुद्राळे, प्रवाशी

पाली : वाशी खाडी पुलावरील रस्त्याच्या कडेची लोखंडी जाळी तुटली आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. 14) सकाळपासून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी आहे. टोल नाक्याच्या अलीकडे दोन किमी पासून वाहणांच्या रांगा लागल्या आहेत.

पुलावर रस्ता जोडण्यासाठी मधोमध आडव्या जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. यातील एक  पुलाच्या मध्यावरील कडेची जाळी तुटली असून खड्डा पडला आहे. त्यामुळे  वाहने बाजूने जात आहे. सध्या तिथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाशी पासून वाशी टोल नाक्या पासून वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वाहणांच्या लांब रांगा लागल्या आहे. टोल नाक्यावर पुलावर जाळी तुटल्याच्या त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याच्या सुचना स्पीकरवर दिल्या जात होत्या.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :