पोलिसांनी वाचवले 55 पर्यटकांचे प्राण

सुनील पाटकर
सोमवार, 26 जून 2017

माणगाव : पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि नशिबाची साथ या जोरावर माणगाव तालुक्‍यातील भिरा परीसरात वर्षापर्यटनासाठी आलेल्‍या मुंबईतील जवळपास 55 पर्यटक विद्यार्थ्‍यांचे प्राण वाचले आहे. हे सारे पर्यटक येथील देवकुंड भागातील नदीपात्रापलीकडे धबधब्‍यावर गेले होते.

माणगाव : पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि नशिबाची साथ या जोरावर माणगाव तालुक्‍यातील भिरा परीसरात वर्षापर्यटनासाठी आलेल्‍या मुंबईतील जवळपास 55 पर्यटक विद्यार्थ्‍यांचे प्राण वाचले आहे. हे सारे पर्यटक येथील देवकुंड भागातील नदीपात्रापलीकडे धबधब्‍यावर गेले होते.

मुंबईतील पोतदार कॉलेज, केळकर कॉलेज व एच.आर. कॉलेज अशा तीन महाविद्यालयातील 55 विद्यार्थी व विद्यार्थीनी  कुंडलिका नदीचे उगमस्‍थान असलेल्‍या देवकुंड येथील धबधब्‍यावर 25 जूनला सकाळी पोहोचले होते.येथे सर्न जण भिजण्‍याचा मनसोक्त आनंद घेत असताना दुपारी अचानक पावसाचा जोर वाढल्‍यामुळे नदीपात्रातील पाण्‍याची पातळी वाढली. आणि हे सर्वजण या ठिकाणी अडकून पडले होते. 

माणगाव पोलीसांना हि घटना कळतातच त्यांच्या रुपाने साक्षात देवदूतच मदतीला धावले या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप,कर्मचारी अनिल वडते,रमेश बोडके तसेच श्री.टेकाडे यांनी विरेंद्र सावंत यांचे दैव राफटरचे पथक घेवून धाव घेतली.दोर बांधून त्या सहाय्याने एकेकाला नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. पोलीस आणि राफटरच्‍या टीमने दोन ते अडीच तास निकराचे प्रयत्‍न करून या सर्वांची संध्‍याकाळी उशिरा सुखरूप सुटका केली.

माणगाव पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या ठिकाणी कोणतीही गंभीर प्रसंग ओढावला नाही .पर्यटना साठी येणा-या प्रत्येकाने आपली काळजी  बेजबाबदार आणि निष्काळजीपणा करु नये हे प्रशासन ओरडून सांगत असले तरीही याकडे डोळेझाक केल्याने काय घडू शकते याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे.
 

मुंबई

8 ते 10 कोटींचा व्यापार ठप्प मुंबईः भाद्रपद अमावस्या संपत आली असून, दक्षिण मुंबईतील हक्काची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेला...

03.36 PM

ठाणे : ठाण्यात पावसाची रिपरिप सुरूच असुन मागील 24 तासात 151 मिमी पावसाची नोंद झाली. वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या...

12.51 PM

मुंबई : मागील तीन महिन्यांपासून चाललेले मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाचे...

10.03 AM