रेल्वेत मिळणार कागदी ग्लासातून पेय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मुंबई - पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून राज्यात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेतील स्टॉलधारकांनी प्रवाशांना पाणी, चहा व शीतपेय देण्यासाठी, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्लॅस्टिक ग्लासऐवजी कागदी ग्लास वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या बहुतांश स्टॉलधारक प्रवाशांना पाणी, चहा, शीतपेय देण्यासाठी प्लॅस्टिक ग्लासचा वापर करतात. बंदीच्या पार्श्‍वभूमीवर या उर्वरित प्लॅस्टिकचा साठा नष्ट करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करण्याचा विचार करत आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) यापूर्वीच त्यांच्या वॉटर व्हेंडिग मशिनधारकांना व फूड प्लाझाधारकांना प्लॅस्टिक बंदीविषयी आगाऊ माहिती दिली आहे. तसेच त्यांना प्लॅस्टिकला पर्यायी वस्तूंचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: railway paper glass colddrink