रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये पेटीएम ऍप आघाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई - रेल्वेची तिकिटे आरक्षित करण्यात पेटीएम ऍपने बाजी मारली आहे. महिन्याला 10 लाख तिकिटांचे बुकिंग या ऍपमार्फत होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई - रेल्वेची तिकिटे आरक्षित करण्यात पेटीएम ऍपने बाजी मारली आहे. महिन्याला 10 लाख तिकिटांचे बुकिंग या ऍपमार्फत होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भारतीय रेल्वेच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळावर तिकिटांसाठी क्रेडिट/डेबिट कार्डाचा पर्याय असताना या ऍपला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पेटीएम आणि आयआरसीटीसी यांच्यात सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या करारानुसार विमान, रेल्वे आणि इतर सेवांसाठी ऑनलाईनचा पर्याय देण्यात आला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेसच्या पर्यायावर सर्वांनीच भर दिला; पण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर नेट बॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डाचा पर्याय आधीच देण्यात आला होता. त्याला पेटीएम ऍपची जोड दिल्यामुळे 90 टक्के ऑनलाइन व्यवहारात पेटीएम ऍपचा वापर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Railway ticket booking paytm App