पाक कलाकारांनो 48 तासात देश सोडा: मनसे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016

मुंबई - भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानच्या कलाकारांना 48 तासात देश सोडण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी पाकिस्तानच्या कलाकारांना येत्या 48 तासांत देश सोडण्यास सांगितले आहे. तसेच जर येत्या 48 तासांत देश सोडला नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला बाहेर काढू, असा इशाराही खोपकर यांनी दिला आहे.

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट आहे. दहशतावाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले आहेत. दरम्यान उरणमध्ये शस्त्रास्त्रधारी अज्ञात व्यक्ती आढळल्याने खळबळ माजली असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.