बिहारमधून मुंबईत आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

वसई - रागाने बिहारमधील घरातून दादर रेल्वेस्थानकात आलेल्या 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना वसई रेल्वे पोलिसांनी 12 तासांत अटक केली.

वसई - रागाने बिहारमधील घरातून दादर रेल्वेस्थानकात आलेल्या 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना वसई रेल्वे पोलिसांनी 12 तासांत अटक केली.

बिहारमधील बागलपूर जिल्ह्यातील तरुणी घरातील जाचाला कंटाळून 15 जानेवारीला घरातून बाहेर पडली. मुंबईत काम करण्याचे ठरवून ती दादर रेल्वेस्थानकात आली. फलाट क्रमांक 5 वर ती फिरत असताना तिला बिहारला पुन्हा सोडतो; परंतु आज रात्री आमच्या घरात राहा, असे सांगून फलाट क्रमांक 5 च्या बाहेर नेले. त्यानंतर रात्री 2च्या सुमारास तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर तिला त्यांनी घराबाहेर काढले. या घटनेनंतर ती पुन्हा दादर रेल्वेस्थानकातून लोकलमध्ये चढली. तिची अवस्था बघून डब्यातील काही महिलांनी चौकशी केली असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी तिला वसई रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. महिला पोलिस निरीक्षक सुरेखा मढे यांनी तिची चौकशी केली असता, तिने सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिस पथकाने तातडीने तपास करून अनिलकुमार ऊर्फ टॉनी, अजय पारसनाथ शर्मा, लवकुश सीता शर्मा यांना अटक केली.

Web Title: rape in vasai