रयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात

Shatabdi-Mahotsav
Shatabdi-Mahotsav

मोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4  आक्टोबर 1919 रोजी विजया दशमीच्या शुभ मुहुर्तावर या शिक्षण संस्थेची सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले येथे स्थापणा झाली. 42 महाविद्यालये, 439 हायस्कूल, 27 वसतीगृहे, 160 उच्च माध्यमिक विद्यालये, 17 शेती महाविद्यालये, 5 तंत्र विद्यालये, 5 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 8 डी.एड महाविद्यालये, 45 प्राथमिक व व पूर्व महाविद्यालये, 8 आश्रमशाळा 58 आयटीआय अशा विविध 737 संस्थातून साडेचार लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ही आशयाखंडातून सर्वांत मोठी संस्था आहे. 4  आक्टोबर 1919 ते आजअखेर अविरतपणे ही संस्था ज्ञानदानाचे काम करते आहे.  या वर्षी ही संस्था आपले शताद्बी वर्ष साजरे करत आहे. 

मोखाडा येथील शिक्षणाची निकड ओळखून या परिसरात 1960 पासून शिक्षणाला प्रारंभ झाला. हायस्कूल पासून शिक्षणाला आरंभ करून आज या संस्थेच्यावतीने मोखाडा व जव्हार परिसरात 4 हायस्कूल, 5 आश्रमशाळा व पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची सोय असणारे वरिष्ठ महाविद्यालय या संस्थेच्या वतीने चालविले जाते. या परिसरात इतका मोठा पसारा असणारी ही संस्था आपले शताद्बी महोत्सव साजरे करीत आहे. या अनुषंगाने मोखाडा येथील रयत संकुल, विविध मान्यवर व रयतप्रेमी यांच्यावतीने या रयत शताद्वी महोत्सव सप्ताहाचे आयोजन केले आहे. याचा प्रारंभ आज दि.22 सप्टेबर 2018 रोजी संकुलच्यावतीने भव्य प्रबोधन रॅलीने झाला. या रॅलीत कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा अनेक महामानवाची वेशभूषा  परिधान करून त्यांच्या कार्याचा संदेश पोहचविला.

याच शताद्बी महोत्सव सप्ताहाच्या अनुषंगाने मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.  त्यामध्ये विद्यार्थ्याना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यावरील चित्रफित दाखविली जाणार आहे.  कर्मवीर भाऊराव पाटील जीवन आणि कार्य या अनुषंगाने डॉ. शंकर बोर्‍हाडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. शिवाय माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. या प्रसंगी शाखा फलक अनावरण होणार असून क्रीडा स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन व  शताद्बी प्रकल्प आरंभ आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. तर कर्मवीर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या अनुषंगाने होणार्‍या विविध कार्यक्रमात विद्यार्थी, रयतप्रेमी जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन कला, विज्ञान व वाणिज्य महाविध्यालयाचे प्राचार्य डाॅ. जे. जी. जाधव यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com