‘विकासात भूमिपुत्रांना प्राधान्य हवेच’ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

उलवा - ‘भूमिपुत्रांचा आवाज दाबला जातोय, विकास म्हणजे नेमके काय, हेच काहींना कळत नाही. विकासात भूमिपुत्रांना प्राधान्य हवेच, शहरी संस्कृतीत गावपण लोप पावता कामा नये, त्यासाठी गावकऱ्यांनी मतभेद विसरून एकजुटीने राहायला हवे’, असे मत ‘साम टीव्ही’चे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले. ते ‘मशाल’ सामाजिक संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिनी बोलत होते. रविवारी (ता. २) उलवा नोडमध्ये भूमिपुत्र भवनजवळ `मशाल`चा वर्धापनदिन झाला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. 

कार्यक्रमास हास्य कवी अशोक नायगावकर, पत्रकार कांतिलाल कडू, ‘मशाल’चे अध्यक्ष पदाजी कासूकर, कर्नाळा स्पोर्टचे उपाध्यक्ष आर. के. पाटील, नवी मुंबई महापालिकेच्या नगरसेविका भारती कोळी, ॲड्‌. मदन गोवारी, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, युसूफ मेहरअली सेंटरचे संतोष ठाकूर आदी उपस्थित होते. नायगावकर म्हणाले की, ‘डोंबिवलीला झालेले ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन यशस्वी आणि नीटनेटकेपणे या समाजातील धुरिणांनी पार पाडले. गर्दीचा अपवाद सोडला तर तसे संमेलन मी कुठेच बघितले नाही!’ त्यांनी सादर केलेल्या कवितांनी रसिक हास्यात बुडाले होते, तर कधी अंतर्मुख झाले. यावेळी लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा जोडप्यांचा सन्मान करण्यात आला. 

Web Title: Reacting to the development priority of the air