मुंबई : तरूणाचा मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईकांचा निषेध

dead_body
dead_body

मुंबई : धारावीतील 90 फुटी रस्त्यावरील "चंद्रकांत निवास" समोरील स्मशानभूमी रस्त्यावर 21 सप्टेंबरला संध्याकाळी सातच्या दरम्यान बाईकचा धक्का लागल्यावरून झालेल्या धक्काबुक्की मध्ये 29 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. 

नागेश कोडम (39 वर्ष) रस्त्यावरून स्कूटवरून जात असता त्याच्या स्कूटरचा धक्का विनोद गणेश (29 वर्ष) याला लागला असता झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले. कोडमने गणेश याच्या गुप्तांगावर लाथ मारली त्यात गणेश बेशुद्ध झाला. स्थानिकांनी गणेश त्याला सायन हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

आज (ता. 24) दुपारी गणेशचे पार्थिव घेऊन त्याचे नातेवाईक, त्याच्या समाजाच्या लोकांनी धारावी पोलीस ठाण्यासमोर निषेध नोंदवला. यामुळे धारावीत तणाव निर्माण झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com