उद्धव ठाकरे आज पेटवणार शिवसैनिकांत अंगार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (ता. 23) जन्मदिवस असून त्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. महापालिका निवडणुकीचया अनुषंगाने या आठवणींच्या माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांत अंगार पेटवणार आहेत. आज कोणतेही राजकीय भाषण अथवा घोषणा होणार नसून राज्यात होणाऱ्या मुंबईसह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत भगवा फडकावण्याचे आवाहन ठाकरे करणार असल्याचे समजते. 

मुंबई महापालिका जागावाटपाच्या बैठकींचे निष्फळ सत्र सुरू आहे. दोन्ही बाजूंचे नेते चर्चेत सहभागी झाले होते. आकड्याची देवाणघेवाण झाली. तरीही चर्चा थंडावली आहे. ती पुन्हा सुरू होणार असली तरीही अंतिम अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांना बैठकीत सहभागी झालेल्या दोन्ही दिल्याचे त्यानीच जाहीर केले आहे. तरीही जागावाटपाचे दुसरे सत्र सुरू होईल. यात जागावाटप योग्य झाले तर युतीने निवडणूक शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष लढवतील. अन्यथा उद्धव ठाकरे येत्या 26 तारखेला याबाबत घोषणा करतील. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटपात झुलवत ठेवत शेवटी युती भाजपने तोडली. तो दगाफटका भाजपने केला, असे शिवसेनेला वाटत आहे. त्याचा बदला घेण्यासाठी सध्या शिवसेना अशा पद्धतीने रणनीती आखत आहे, असे सांगितले जाते. आम्ही भाजपला प्रत्येक निवडणुकीत 25 वर्षांपूर्वी युती झाल्यापासून जागा वाढवून दिल्या. प्रत्येक निवडणुकीत त्यात वाढ केली. यामुळे आमच्याच जागा कमी कमी होत गेल्या. आता एक पक्ष म्हणून बरोबर नाही, असे उद्धव यांचे म्हणणे असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत.

मुंबई

मुंबई - अकार्यक्षम ठरलेल्या "बेस्ट'च्या 550 बस वर्षभरात भंगारात काढल्यानंतर आता 453 बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट...

04.24 AM

नवी मुंबई  - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वांत जास्त प्रदूषित हवा असणाऱ्या 17 शहरांची यादी जाहीर केली...

03.42 AM

मुंबई - हायप्रोफाइल दुहेरी हत्याकांडातील आरोपी चिंतन उपाध्यायने कारागृहात "स्वातंत्र्य' या विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र...

02.48 AM