कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील धोकादायक झाडे काढा

नंदकिशोर मलबारी 
गुरुवार, 24 मे 2018

कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील नढई येथील एका वळणावर चार ते पाच झाडांची माती पूर्ण निघून गेली आहे. ही झाडे रस्त्यावर पडल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे धोकादायक झाडांना त्वरीत काढून टाकण्याची मागणी वाहान चालकांकडून होत आहे.

सरळगांव : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील नढई येथील एका वळणावर चार ते पाच झाडांची माती पूर्ण निघून गेली आहे. ही झाडे रस्त्यावर पडल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे धोकादायक झाडांना त्वरीत काढून टाकण्याची मागणी वाहान चालकांकडून होत आहे. परंतु, झाडे तोंडण्याची परवानगी वन खात्याकडून मिळत नाही. यामुळे एखादा अपघात झाल्यावर संबंधित खात्याला जाग येणार का? असा प्रश्न वाहन चालक व स्थानिक नागरिक विचारत आहेत.

धोकादायक झाडे काढून टाकण्या संदर्भातील महसूल खात्याचे ना हारकत प्रमाणपत्र वन खात्याकडे देऊन एक वर्ष झाले, तरिही काही कारवाई झाली नाही. या संपुर्ण रस्त्यावर 250 झाडे वादळी वार-पाऊस यामुळे कोलमडून पडण्याची शक्यता आहे. कल्याण - अमदनगर महामार्गावर वाहूतकही मोठ्या वाढली आहे.
 

Web Title: remove dangerous trees on the roads of Kalyan-Ahmadnagar