मोबाईल नंबर बदलून बॅंक खात्यावर डल्ला 

मोबाईल नंबर बदलून बॅंक खात्यावर डल्ला 

मुंबई - 29 वर्षीय खातेदाराने बॅंकेत नोंदवलेला मोबाईल क्रमांक बदलून सायबर चोरट्यांनी या खात्यातून एक लाख तीन हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वांद्रे येथील खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल क्रमांक बदल्यामुळे खात्यातून पैसे काढल्याची माहितीच खातेदाराला मिळाली नाही. 

वांद्रे पूर्वेच्या एका खासगी बॅंकेच्या शाखेत हे खाते आहे. जुलै महिन्यात तक्रारदाराने टीव्ही ईएमआयवर खरेदी करण्यासाठी एका वित्त संस्थेकडून 16 हजार 900 रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचा मासिक हफ्ता एक हजार 400 रुपये होता. त्या संस्थेतही खातेदाराने बॅंकेत नोंदवलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी दिला. ज्यावेळी कर्जाचा हप्ता बॅंक खात्यातून जायचा, त्यावेळी तक्रारदाराच्या मोबाईलवर संदेश व ई-मेल यायचा. सप्टेंबरमध्ये तक्रारदाराच्या खात्यातून 26 हजार रुपये गेल्याचा संदेश त्यांना आला. 16 हजारांचा टीव्ही असताना 26 हजारांचा हप्ता कसा गेला? या शंकेपोटी त्यांनी बॅंकेत चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून एक लाख तीन हजार रुपये काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बॅंकेकडे चौकशी केली असता बॅंकेतील त्यांचा मोबाईल क्रमांक आरोपींनी बदलल्याचे स्पष्ट झाले. यानंतर खातेदाराने तात्काळ खेरवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या व्यवहारांबाबतची माहिती बॅंकेकडून मागवली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com