पत्रकारांनी न्यायालयात जीन्स, टी-शर्ट वापरू नये - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - पत्रकारांनी न्यायालयात जीन्स, टी-शर्ट वापरू नये, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. हे "बॉम्बे कल्चर' नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे. निवासी डॉक्‍टरांच्या संपाविषयी उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, डॉक्‍टरांना राहण्यासाठी चांगल्या सोयीसुविधा आणि त्यांच्या सुरक्षेची सरकारने सर्वतोपरी काळजी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

संपकाळात परिचारिका आणि वॉर्डबॉय यांनी चांगले काम केल्याचे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी उत्तम पद्धतीने केले. त्याचे कौतुक केले पाहिजे, असेही खंडपीठाने म्हटले; पण याचवेळी काही प्रसारमाध्यमांनी न्यायालयातील सुनावणीचे वार्तांकन अयोग्य पद्धतीने केल्याबद्दल उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. निवासी डॉक्‍टरांच्या संपाच्या सुनावणीचे वार्तांकन करत असलेल्या आणि हिरव्या रंगाचे टी-शर्ट परिधान केलेल्या एका पत्रकाराकडे पाहत, टी-शर्ट आणि जीन्स परिधान करणे हा योग्य पेहराव आहे का? अशी विचारणा केली. त्यावर पालिकेचे वकील सुरेश पाकळे यांनी आतापर्यंत कोणी कधी आक्षेप घेतला नव्हता, असे मत व्यक्त केले; तर राज्याचे महाधिवक्ता रोहित देव यांनीही त्याला दुजोरा दिल्याने, असा पेहराव करणे ही संस्कृती नसल्याचे (इज दिस ए बॉम्बे कल्चर) खंडपीठाने सुनावले. असा पेहराव प्रशंसनीय नाही (इट इज नॉट ऍप्रिसिएटेड) असे मतही त्यांनी मांडले.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान, जी मते न्यायमूर्ती व्यक्त करतात, ती कोर्टरूमपुरतीच असतात, त्यामुळे जे आदेशात नमूद असते तेवढेच वार्तांकन झाले पाहिजे. तसेच सगळ्या वृत्तपत्रांमधील बातम्या समान असाव्यात, असे मत व्यक्त केले. त्यामुळे न्यायालयात झालेल्या पाणउतारामुळे प्रसारमाध्यम प्रतिनिधी लगेच कोर्टरूममधून बाहेर पडले. त्यानंतर मात्र, दिवसभर या विषयाची चर्चा न्यायालय परिसरात सुरू होती.

Web Title: reporter do not use jeans, t-shirt in court