रस्त्यांवर गैरव्यवहारांचा खड्डा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

दुरुस्तीवर सहा हजार ६११ कोटींचा खर्च 

मुंबई - मुंबईच्या खड्डेमय रस्त्यांबाबत होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवर यंदाच्या वर्षी शिक्कामोर्तब झाले आहे. पाच वर्षांत पालिकेने तब्बल सहा हजार ६११ कोटींची रस्तेदुरुस्ती केली. त्यात गेल्या वर्षी झालेल्या कामात तब्बल एक हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेत वर्षभर गाजलेला आणि आतापर्यंत उघड झालेला हा सर्वात मोठा घोटाळा आहे.

आतापर्यंत रस्तेदुरुस्ती निकृष्ट दर्जाची कशी होत होती, या घोटाळ्यामुळे उघड झाले आहे.

तरीही ८७ हजार खड्डे 
पालिकेने रस्तेदुरुस्तीवर तब्बल सहा हजार कोटीहून अधिक रक्कम रस्तेदुरुस्तीवर खर्च केली आहे; मात्र तरीही तब्बल ८७ हजार खड्ड्यांची नोंद गेल्या पाच वर्षात झाली आहे. या खड्ड्यांवर महापालिकेने १७१ कोटी रुपये खर्च केले आहेत.

रस्तेदुरुस्तीवर झालेला खर्च 
वर्ष खर्च 

 २०१२-१३ - एक हजार ८१२ कोटी 
 २०१३-१४ - दोन हजार कोटी 
 २०१४-१५ - दोन हजार ८३१ कोटी 
 २०१५-१६ - तीन हजार ८५७ कोटी 

मुंबई

मुंबई - आमचा नंदीबैल दररोज शेकडो आबालवृद्धांना आशीर्वाद देतो... आज आमच्या कुटुंबाला त्याच्या आशीर्वादाची आवश्‍यकता आहे......

05.06 AM

ठाणे - ठाणे स्थानकात उभारण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी सॅटीस पुलाला गळती लागली आहे. पावसाचे पाणी थेट पुलाखालून मार्गक्रमण...

04.15 AM

नवी मुंबई - आठवडाभर अधूनमधून पडणाऱ्या पावसाची शनिवारपासून संततधार सुरू झाली. त्यामुळे शहरातील रस्तेदुरुस्ती पुन्हा खड्ड्यांत गेली...

04.03 AM