आरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानाने शनिवारी रात्री एके-47 मधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याचे नाव दलबीर सिंग (वय 38) असे आहे. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत. दलबीर मूळचा हरियानाचा रहिवासी होता. तीन बहिणी आणि आई असे त्याचे कुटुंब आहे. दोन वर्षांपूर्वी तो आरपीएफमध्ये रुजू झाला होता. तो मुंबई सेंट्रल येथे कर्तव्यावर होता. दलबीर सिंग शनिवारी रात्री मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या गुजरात मेलचे मार्गसंरक्षण करणार होता. त्याकरिता त्याने मुख्यालयातून एके-47 घेतली. मुंबई सेंट्रलच्या हॉल परिसरात गेल्यावर दलबीरने स्वत:वर गोळी झाडून घेतली.

मुंबई - रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानाने शनिवारी रात्री एके-47 मधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याचे नाव दलबीर सिंग (वय 38) असे आहे. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत. दलबीर मूळचा हरियानाचा रहिवासी होता. तीन बहिणी आणि आई असे त्याचे कुटुंब आहे. दोन वर्षांपूर्वी तो आरपीएफमध्ये रुजू झाला होता. तो मुंबई सेंट्रल येथे कर्तव्यावर होता. दलबीर सिंग शनिवारी रात्री मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या गुजरात मेलचे मार्गसंरक्षण करणार होता. त्याकरिता त्याने मुख्यालयातून एके-47 घेतली. मुंबई सेंट्रलच्या हॉल परिसरात गेल्यावर दलबीरने स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्याला रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत जाहीर करण्यात आले.