'नाट्यसंमेलनाध्यक्षासाठी नावे सुचवा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चौरंगी लढत होणार असतानाच आता 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सभासदांनी संमेलनाध्यक्षपदासाठी नावे सुचवून अर्ज करण्याचे आवाहन नाट्य परिषदेने केले आहे.

सभासदांनी आपले सूचनापत्र सूचित व्यक्तीच्या लेखी संमतीसह तसेच सूचक-अनुमोदकांच्या स्वाक्षरीसह परिषदेच्या यशवंत नाट्यसंकुल, मनमाला टॅंक, माहीम, मुंबई-400016 येथील कार्यालयात 5 नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी 6 पूर्वी सीलबंद पाकिटामध्ये सादर करावे, असे आवाहन नाट्य परिषदेने केले आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार होणार नाही. सूचक, अनुमोदक व सूचित व्यक्ती या नियामक मंडळाच्या सदस्य असता कामा नयेत; मात्र त्या व्यक्ती परिषदेच्या आजीव सदस्य असाव्यात, अशी सूचनाही परिषदेने केली आहे.