सलमान पुन्हा व्यक्त झाला "त्या' वक्तव्यावर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने महिला आयोगाला आज पुन्हा एकदा उत्तर पाठवले आहे. "सुलतान‘ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्याला एकूण तीन वेळा नोटिस बजावलेली होती. मात्र राज्य महिला आयोगाने नोटीस पाठविल्यानंतर आज अखेर या अभिनेत्याने त्याला उत्तर दिले. या प्रकरणी सलमानने माफीसाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी या वृत्ताला दुजोरा देत एएनआयशी बोलताना म्हणाल्या,"" सलमानकडून कालच या नोटीशीचे उत्तर आले असून या प्रकरणी पुढे कोणती कायदेशीर कार्यवाही करता येईल याचा विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येईल,‘‘ 

या संदर्भात अधिक तपशील उपलब्ध नसून काही खासगी वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार,""खानच्या कायदेतज्ज्ञांनी महिला आयोगाने हे प्रकरण हाताळण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. 
सलमान खानने या प्रकरणी माफी मागण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. 

सलमान खानच्या या वक्तव्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाने देखील एकदा नोटिस बजावलेली होती. या विधानावरून नेटिझन्सनी देखील प्रचंड टिका केली होती. राज्य महिला आयोगाने या नंतर दोनदा नोटीस पाठवूनही सलमान खानने त्यावर उत्तर पाठविले नव्हते.

मुंबई

तुर्भे  - दगडखाणींमुळे प्रदूषणात 10 टक्के वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना श्‍वसनविकारांचा सामना करावा लागत आहे. याच...

05.33 AM

तुर्भे  - 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा जवळ आल्याने सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे...

05.03 AM

मुंबई -  अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या "मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई...

04.24 AM