'सर्जिकल स्ट्राइक' हवेत पण खोटे नकोत- निरूपम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

मुंबई- ‘सर्जिकल स्ट्राइक‘ हवेत परंतु ते खोटे नकोत, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत म्हणाले.

निरूपम म्हणाले, ‘सरकारने जवानांच्या कारवाईचा राजकीय फायदा घेऊ नये. भारतीय सैनिकांच्या ताकदीचा गर्व आहे, पण भारतीय जनता पक्ष (भाजप) राजकीय फायदा घेत आहे. देशाचे जवान हुतात्मा होत असताना भाजप त्याचा राजकीय फायदा उचलत आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर भाजपकडून पोस्टरबाजी करण्यात आली.‘

सर्जिकल स्ट्राईकबाबत ‘56 इंचाच्या छाती‘कडून पुरावे सादर होत नाहीत, तोपर्यंत शंका राहणारच. पाकिस्तानने भारताच्या कारवाईवर आक्षेप घेतला तरीही भारताने पुरावा का दिला नाही?, असा सवालही निरुपम यांनी उपस्थित केला.